किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया
कधी होतो अखंड प्रेमात मग्न
दुसऱ्यांदाही कधी लागतं लग्न,
लग्नाच्या वरातीत स्वतःच नाचतो,
स्वतःच्याच लग्नात मंगलाष्टकं म्हणतो,
कशी सगळी वाटते ना ही मोहमाया,
किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
अभ्यास करतो कधी भूगोलाचा,
पेपर समोर वेगळ्याच विषयाचा,
अर्धवट पेपर सोडण्यातही आनंद वाटतो,
मग नापास झाल्याचा रिझल्ट हातात पडतो,
खूप झाली भीती मनात ती रात्र जागवाया,
किती भन्नाट आहे ही स्वनांची
दुनिया.... 😇
कधी असते भयाण शांतता,
कधी काळोख दिसतो,
कधी नुसते रडण्याचे आवाज तर,
कधी बत्तीशी काढून हसतो,
थेट गप्पा असतात बरं भूता प्रेतांशी,
कधी देवाच्या दरबारातल्या आपणच रंभा
ऊर्वशी,
देवाला मदत हवी रे तुझी म्हणून कोणी
येतं बोलवाया,
कसली भन्नाट आहे ना ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
कधी मन खचून जातं,
उत्साही आयुष्य भकास होतं,
जेंव्हा घरातलं हसतं खेळतं माणूस,
आपला निरोप घेतं,
आभाळ पडतं, पायाखालची जमीन हादरते,
जेंव्हा तेच माणूस सकाळी आपल्याला
उठवायला येतं,
तसा तो एक क्षण पुरेसा आहे त्याची
किंमत कळाया,
खरच किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
कधी परग्रहावरची स्वारी तर,
कधी एलिअनच आला घरी,
आपणच कधी हिरोईन असतो
कधी रोल व्हीलनचाही मिळतो,
खरं तर कशाचा कशाला मेळ लागत नाही,
अर्थ लावत बसलो तर, समजेल असा खेळ नाही,
पण गंमत येते हे सगळं काही बघाया,
खरच कसली भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇🙃🧐😴
- अस्मिता कुलकर्णी
खूप सुंदर लिहिलं आहेस, माझे स्वप्न सुद्धा असेच भन्नाट असतात
ReplyDeleteHeheh...Thank you🙂😃
DeleteKhup chan asmita..mala he pan awadel jayal:)
ReplyDeleteThank you...😀
Deleteमस्त छान आहे स्वानाची दुनिया 👌👌
ReplyDeleteThank you..😀
Deleteखूप छान
ReplyDeleteThank you😀
DeleteSo funny n very true experience for everyone! Back to track with new touch! Thank you! Keep it up 👍👍👍😘
ReplyDeleteHona..Mala lihitana pan maja ali..Thanks dear
Deleteखूप छान अस्मिता... लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या झाल्या...
ReplyDeleteThank you..🙂
Delete😴😴😴 अस्मी, मला लगेच झोपावस वाटलं... तुझ्या या दुनियेत मी पण फिरून येईन.... पण झोपेत तुलाच भेटायला येईन...🤩
ReplyDelete😄 ये लवकर..मी वाट बघते.
ReplyDelete