जीवन एक सुंदर गाणं ♫♫♫

प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... 

आपल्याच अवखळ शब्दात,
ते अगदी सहज मांडावं,
स्वतःच्या स्वरातच पण,
स्वच्छंदपणे गुणगुणावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

तालासुरांसारखंच नात्यांना,
कसं हळुवार जपावं,
नात्यांच्या सोबतीनेच
ते अगदी सुरेल रंगवावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

सुख दु:खाच्या मैफिलीत,
कधीतरी हरवून जावं,
मनाला साद घालत,
भान हरपून गात रहावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

तक्रार असली तरी, लयबद्ध असावं,
माघार घेतली कधी तरी, स्थितप्रज्ञ असावं,
गुणगुणता येईल सर्वांबरोबर,
असं सहज सोप्पंही दिसावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

मग कधीतरी शांत बसून
आपल्यालाच ऐकावं,
पुढचे स्वर हसरेच लागू दे रे,
मागणं एकच असावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫

अस्मिता कुलकर्णी 

Share:

0 comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या