आता खरं सुरुवात झाली होती ती पुढच्या session ला येतेय की, नाही यावर सगळं अवलंबून होतं.
नवीन दिवस उगवला. मी
नेहमीप्रमाणे तयार होऊन सेंटर मध्ये हजर. पण आज मात्र ते दोघे मला दिसले नाहीत
माझी निराशा झाली. काळजी वाटली. मी तिची अगदी मनापसून वाट बघत होते. बराच उशीर
झाला होता. माझी आशा मावळली. पण तितक्यात ते दोघेही आले आहेत असं सांगण्यासाठी
आमचे रघु काका आत आले, आणि माझा जीव भांड्यात पडला. सिद्धार्थ ऑफिसला गेला आणि
तिला मी आत बोलावले. आज मात्र ती जरा फ्रेश वाटत होती उशीर का झाला म्हंटल्यावर
मला तिने कारणही सांगितले. मलाच मोकळं वाटलं. आज ती नक्की माझ्याशी मोकळेपणाने
बोलणार याची मला आता पक्की खात्री वाटत होती. रादर आज फक्त तिच बोलणार असं वाटत
होतं.
मी तिला स्वतः बद्दल काही सांगशील का असे
विचारले. तिने मानेनेच हुंकार दिला. आणि ती सांगायला लागली.
“आमचे गाव खूपच खेडं आहे.
जे मला खूप आवडतं, लग्नही तिथेच झालं. त्यामुळे आजूबाजूलाही तिच परिस्थिती, चार
माणसं जास्ती नाहीत की, गर्दी नाही, धावपळ नाही. अगदी
रोजच्याच कामात थोडा सुद्धा बदल नाही.” ती थांबली, परत गावामध्ये रमली. मी “प्रेरणा”
म्हंटल्यावर ती पुढे सांगू लागली. “आमचं जेंव्हा मुंबईला येण्याचं ठरलं त्यावेळी, बऱ्याच
लोकांकडून मुंबईबद्दल खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे मला माझीच काळजी वाटत होती. इकडे
येतानाच जेंव्हा माझे गाव मागे मागे चालले होते तेंव्हाच माझ्या मनात अगदी धस्स
झालं होतं. मुंबईत कोणी ओळखीचही नाही. काही अडचण आली तर कसं करणार. मुलांच्या
शाळेचा अभ्यास मला घ्यायला जमेल का? मुंबईतल्या लोकांसारखं राहायला, बोलायला जमेल
का? त्यांच्या विचारांशी माझे
विचार जुळतील का ? असे खूप विचार माझ्या
मनात येत होते. मुंबई जवळ येत होती तसतशी झाडं कमी होऊन माणसांची गर्दी वाढत होती.
मुंबईत पोहोचलो आणि सुरुवातीलाच गाड्यांची मोठ्ठी रांग लागल्यामुळे आमची बस खूप
वेळ एका जागीच थांबली होती. मला अगदीच गुदमरल्यासारखं होत होतं.
तिला आत्ताही खरच खूप घाम आला होता.
“पुढे इथे
गाडीतून उतरलो आणि खूपच माणसं, गाड्या, उंच इमारती बघून जीव घाबरून गेला. रस्ता
सुद्धा ओलांडता येईना, सिद्धार्थ खूप भरभर लोकल साठी धावत होता. मी आणि मुलं फक्त
त्याच्या मागे मागे चाललो होतो. स्टेशन वर पोहोचलो आणि समोरून भरधाव येणाऱ्या
लोकलमुळे मात्र मी अगदीच गांगरून गेले.”
मला समजलं, मनातल्या अनेक
प्रश्नांनी येण्याच्या आधीपासूनच तिला कमकुवत बनवायला सुरुवात केली होती. सरळ
चाललेल्या आयुष्याने अचानक वेगळे वळण घेतले होते. तिच्या मनात आधी पासूनच भीती
बसली होती. मुंबईत आल्यानंतर ती समोर दिसायला लागली. जाणवायला लागली. एकटीने बाहेर
जाणेही तिला अशक्य वाटू लागले. लोकांशी संवाद तिला जमेना, हळू हळू मुलांना शाळेत
सोडणे आणणे बंद झाले. मुलांचा अभ्यास घेणे तिला अवघड वाटू लागले. मुलांशी नवऱ्याशी
बोलणही कमी झालं उगाचच झोपून राहायला लागली. हळू हळू तिला काहीच जमेनासे झाले. या
सगळ्यामुळे सिद्धार्थची नकळत पणे तिच्यावर खूप चिडचिडही वाढली होती. त्याचा तिला
जास्तीच त्रास होत होता.
ती सांगतच होती, “आमच्या
गावी असताना आम्ही खूप खुश होतो. आमचा प्रेम विवाह, एकमेकांवर जीवापाड प्रेम. मला दोन
मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. माझं शिक्षण अर्धवटच राहिलेलं. घरातली
परिस्थिती नाजूकच होती, पण मी लहान लहन मुलांचे
क्लास घेत होते. रांगोळी मेहंदी काढायला मला फार आवडायचं. आणि मला बोलवायचे देखील
लग्न घरी मेहंदी काढायला. मला स्वयंपाक बनवायलाही खूप आवडायचं. दुसऱ्यांना चांगलं
खायला घालणं यापेक्षा समधान कशातच नाही असच मला वाटायचं.”
तिच्या बोलण्यावरून आणि तिला दिलेल्या टास्क
वरून लक्षात येत होतं की, प्रेरणामध्ये खूप चांगले
गुण होते. तिला खूप गोष्टींची आवड होती. तिच्याकडे कल्पकता होती. दिसायलाही सुंदर
होती. घरातली कामे तर अगदी पटापट करत. घरात सगळं काही टापटीप. प्रसन्न वातावरण, स्वयंपाकही
रुचकर बनवत. आयुष्यात आत्तापर्यंत त्यांनी खूप त्रास सहन केला होता. एकमेकांच्या
भक्कम साथीने ते प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले होते.
खरं तर ती आहे तशीच खूप सुंदर, हुशार होती फक्त मनातले
पूर्वग्रह आणि भिती यामुळे तिच्यातला आत्मविश्वास हारवत चालला होता. मुळात बदलाचा ‘स्वीकारच’
झाला नव्हता. त्यामुळे नवीन परिस्थितीतही मी चांगलं काही करू शकते याची तिची
स्वतःबद्दलच खात्री होत नव्हती.
एकंदरीत सगळाच अंदाज
आल्यावर एक उपचार म्हणून तिला करण्यासाठी सांगितलेल्या कृतीवरून असे समजले की तिची
हुशारी, टापटीपपणा सारं काही तसच
आहे. पण हरवला होता तो “आत्मविश्वास” वागणं बदलण्यामागचं कारण समजल्या बरोबर उपचार
सुरु केले. तिच्या नावाप्रमाणे तिच्यातही किती प्रेरणा दडलेली आहे याची जाणीव तिला
करून दिली. तिचा स्व तिला परत आणून दिला. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख करून दिली.
यात बरेच दिवस गेले जवळ जवळ दोन महिने. तिनेही Thearpy ला चांगलाच Response दिला. हरवलेला आत्मविश्वास ती पुन्हा शोधू लागली
आणि तिला तो सापडला. खूप दिवस एकाच जागेवर बसलेल्या पक्षाला उडता येत नसेल आणि
अचानक तो आकाशात विहरताना कसा दिसेल तसं मला तिच्याकडे बघून जाणवायला लागलं. ती
खुश राहायला लागली. बाहेर जाणं वाढलं. चार मैत्रिणीही झाल्या. मुलांकडे व्यवस्थित
लक्ष द्यायला लागली, आणि तिला घेऊन आलेल्या त्याला पुन्हा आपल्या वर्तुळात बघू
लागली.
“बदल हा निसर्गाचा नियम आहे.”
हा बदल आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात येतच असतो. जसं की, घर बदलणं,
गाव बदलणं, माणसं बदलणं, नोकरीतला बदल, परिस्थितीतला बदल, वयानुसार माणसा माणसात
होणारे बदल. ह्या बदलांना, परिस्थितीला ठामपणे, आत्मविश्वास न डगमगू देता सामोरे
जावेच लागते. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे होणाऱ्या बदलाचा मनापसून स्वीकार
करावा म्हणजे परिस्थितीशी समरूप होता येते. मनात कोणतेही पूर्वग्रह, भीती ना बाळगता येणाऱ्या परिस्थितीचा डोळसपणे सामना करावा. मला हे जमेलच असा विश्वास
नेहमी स्वतःमध्ये असायला हवा. नाहीतर आपल्यातले आपणच हरवून जातो
आज शेवटची भेट होती. म्हणजे या साठीची तरी, त्या पहिल्या दिवसामध्ये
आणि आजमध्ये खूपच फरक होता. दोघांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद होता. डोळ्यातही चमक
दिसत होती. बस्स, त्यांच्याकडे बघून मलाही माझ्या घेतलेल्या त्यांच्या विश्वासाची
जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद झाला. माझे नेहमीचे हास्य अजूनच खुलले. दोघांच्या
चेहऱ्यावर एकही शंकेची रेष दिसत नव्हती. त्यांनी माझ्यासाठी एक बुके आणला. बोलणं
झालं, त्याने माझ्या हातात एका पानावर काहीतरी लिहून दिलं होतं. ते निघाले अगदी
मनमोकळे हसत.
त्यानंतर मी ते लिखाण
वाचायला सुरुवात केली. त्याच्या मनात साठलेल्या प्रत्येक भावना त्याने त्यावर
उतरवल्या होत्या. शेवटी त्याने असा उल्लेख केला होतं की, “आयुष्यात सगळ्यात सुंदर आणि सोबत राहणारं
माझं नातं हरवत चाललं होतं ते तुम्ही मला परत
सापडून दिलं. तुम्ही माझी बायको, माझी प्रेयसी आणि मुलांना त्यांची आई परत मिळवून
दिली. खरच खूप खूप Thank you.”
वाचताना अंगावर काटा आला. शरीर शहारलं, डोळ्यात
नकळत पाणी तरळलं, मनात मात्र अस्मानीचा आनंद झोके घेत होता.
....एखाद्याच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा
भरण्यासाठी आपला उपयोग होणं यापेक्षा समाधान कशात असू शकते.....
अस्मिता कुलकर्णी
खुप सुंदर
ReplyDeleteThank you...
DeleteVery positive blog👏👏
ReplyDeleteThank you..
DeleteKhup chhan, inspiring and touching incidence.
ReplyDeleteBest wishes!!
Thanks dear...
Deleteखूप छान: '“बदल हा निसर्गाचा नियम आहे.” हा बदल आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात येतच असतो. जसं की, घर बदलणं, गाव बदलणं, माणसं बदलणं, नोकरीतला बदल, परिस्थितीतला बदल, वयानुसार माणसा माणसात होणारे बदल. ह्या बदलांना, परिस्थितीला ठामपणे, आत्मविश्वास न डगमगू देता सामोरे जावेच लागते. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे होणाऱ्या बदलाचा मनापसून स्वीकार करावा म्हणजे परिस्थितीशी समरूप होता येते. मनात कोणतेही पूर्वग्रह, भीती ना बाळगता येणाऱ्या परिस्थितीचा डोळसपणे सामना करावा. मला हे जमेलच असा विश्वास नेहमी स्वतःमध्ये असायला हवा. नाहीतर आपल्यातले आपणच हरवून जातो' ������
ReplyDelete