
शेजारच्या घरात राहणारं जोडपं, साधारण साठ-सत्तर वर्षाचं असेल. आजी सांगायची त्यांच्या काळातला ‘प्रेम विवाह’. एकमेकांवर जीवापाड प्रेम, एक मुलगी तिचं लग्न झालेलं. फार गोतावळा नाही. अगदी राजा-राणी सारखे दोघंच एमेकांसाठी, पण अतिशय समाधानी, प्रत्येक क्षणा-क्षणात आनंद शोधणारे, एकमेकांची काळजी घेणारे. औषधं, पथ्यपाणी अगदीच जपणारे. मी बघितलं आहे त्यांच्या घरात जुन्या फोटोच्या खूप फ्रेम लाऊन ठेवल्या आहेत आणि जुने गिफ्ट्स सुद्धा अगदी अचूक जागेवर ठेवलेले आहेत. ते अजूनही लग्नाचा वाढदिवस एकमेकांना काहीतरी सरप्राईज देऊन सेलिब्रेट करतात. फिरायला गेल्यावर ते अजूनही तिच्यासाठी मोगऱ्याचाच गजरा घेतात आणि तीसुद्धा चक्क लाजून त्यांना तो माळायला लावते. तसा त्यांचाही आंबट गोड संवाद चालूच असतो, आणि नंतर घरात येणारा ओंजळीतला चाफा त्यांचं नातं खुलवतो..
खरच एक सुंदर हुरहूर लावणारं नवरा-बायकोचं नातं म्हणजे एक
नाजूक कळीच असते. ती आपोआप फुलतेच, आपण तिला खुलवणं खूप महत्वाचं असतं. नात्यात
भरभरून प्रेम असणं,
विश्वास
असणं,
काळजी
घेणं, एकमेकांचा विचार करणं, त्या विचारांचा आदर करणं, प्रत्येक भावना हळुवार जपणं हे या नात्यात
सहजता आणतं,
मोकळेपणा
आणतं. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्या प्रकारची नाती जन्मापासून असतातच पण एक
अनोळखी माणूस आपलं अख्खं आयुष्यच बनून जातो. अगदी हक्काचं, मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे
नवरा-बायकोचं....
“लग्न” या सुंदर विधीमुळे हा धागा आपल्याशी कायमचा बांधला
जातो. जो कधीही तुटणार नाही, ताणला जाणर नाही, विरळ होणार नाही याची काळजी आपण सतत घेत
असतो. लग्न ठरल्यापासून अगदी त्या क्षणापासून आपण एकमेकांचे झालो आहोत असं वाटायला
लागतं,
मन
हवेत झोका घ्यायला लागतं, जगातील सर्वात नशीबवान
व्यक्ती आपणच आहोत असं काहीसं वाटायला लागतं.
जगणं किती सोप्पं आहे जाणवायला लागतं. खूप मनापासून एकमेकांना आपलं मानलं जातं.
कोणाशीही कधीही न बोललेल्या गोष्टी दोघात सहज बोलल्या जाऊ लागतात, आणि तेही आपल्याच नकळत. स्वप्नातला तो आणि ती
खरोखरच समोर आल्यासारखं वाटतं.. दोघांचं असणं, वागणं, हसणं, बोलणं एकमेकांसठी खूप अर्थपूर्ण
ठरतं. दोघे एकमेकांशिवाय जगूच शकत नाही असं नातं निर्माण होतं. विचार केला तरी
डोळे पाणवतात,
इतके
एकरूप होऊन जातात नवरा-बायको. तो आधार तो विश्वास इतका समधान देऊन जातो की, वाटतं बस्स आता दुसरं काहीच नको. आयुष्यात
ह्या एकाच व्यक्तीबरोबर आपण आपले आयुष्य भरभरून जगू शकतो. “निरपेक्ष आभाळात विहरताना जितकं मोकळं आणि
स्वच्छंद वाटतं अगदी तसच एकमेकांच्या सहवासात असताना वाटतं.”
त्या व्यक्तीचा खांदा आपला पक्का आधार होतो, तिचा हातातला घट्ट हात आपल्या जगण्याची ताकद
बनतो,
मारलेली
प्रत्येक मिठी आपल्या समाधानाची पातळी ठरवते, एकमेकांची स्वप्नेच ध्येय बनतात, घेतला जाणारा प्रत्येक श्वास एकमेकांच्या मनाचा मोकळेपणा
ठरवतो. वेगवेगळा असा विचारच करता येत नाही. आनंद, दु:ख सगळ्याच भावना वाटून घेतल्या जातात. आवडलेल्या गोष्टी जश्या
बोलल्या जातात तश्याच न आवडणाऱ्या गोष्टीही सहज बोलल्या जातात. जगण्याचं एक सुंदर
कारण अलगद उलगडत जातं.
मी माझ्या ओळखीत कितीतरी वयस्कर जोडपे अशी बघितली आहेत की
जी सगळीकडे बरोबर फिरतात. एकमेकांशिवाय त्याचं पानही हालत नाही. करमणुकीसाठी
त्यांना बाहेरच्या गोष्टींची गरजही भासत नाही. मनापासून जगतात आणि एकमेकांसाठीच
जगतात.
मला अशी शंका वाटते की, आजची पिढी आजी-आजोबा झाल्यावर अशीच एकमेकांना
साथ देतील का?
आत्ताच्या
चढाओढीच्या काळात बाहेरच्या लोकांबरोबर, काही नवरा-बायकोतही स्पर्धा चालू असते.
स्वतःच्या इगो मुळे आपल्याच जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जात आहे याची काही जणांना
जाणीवही नसते. ‘स्पेस’ च्या नादात दुरावणारा संवाद घराघरात वाढत चाललाय. खरं तर
स्पर्धा,
ईर्ष्या
या नात्यात तरी नसावी. दोघांनीही एकमेकांना वेळ देऊन, समजून घेऊन शेवटपर्यंत ह्या आजी आजोबांसारखीच
साथ द्यायला हवी..
खरच, एकमेकांच्या सोबतीशिवाय पूर्णत्व नाहीच.
सुंदर
स्वप्न बघण्यासाठी,
तिच्या
नजरेची सोबत...
डगमगणाऱ्या
वाटेवरून चालताना,
त्याच्या
सावरणाऱ्या हातांची सोबत..
येणाऱ्या
प्रत्येक सुख दु:खात, तिच्या भावनांची सोबत...
आपलं
नातं सुंदर फुलवण्यासाठी, त्याच्या तिच्यावरच्या विश्वासाची सोबत...
मनसोक्त
आनंदासाठी,
तिच्या
सहवासाची सोबत...
गोंधळलेल्या
मनाला,
त्याच्या
विचारांची सोबत..
महत्वाच्या
प्रत्येक क्षणी,
तिच्या
निर्णयाची सोबत...
चुकलेल्या
क्षणी समजून सांगणाऱ्या, त्याच्या शब्दांची सोबत...
आणि
हे सगळं अनुभवण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी, फक्त आणि फक्त एकमेकांच्या प्रेमाची सोबत...
अस्मिता कुलकर्णी
😍😍😍😍woow mast Asmita!!
ReplyDeleteKya bat he, khup chhan
Keep going 👍
Thanks dear.... : )
Deleteछान!
ReplyDeleteThank you..
DeleteVery nice Asmita 👌👌
ReplyDeleteThanks dear...
DeleteApratim! Kiti nemka, netka, lihilay. Keep it up.
ReplyDeleteThank you so much....
Delete8bitco Casino | Official site of SBCI, UK | DrmCD
ReplyDelete8BitCo Casino is one of 포항 출장안마 the best 원주 출장샵 online 순천 출장안마 casinos and gambling sites in the UK. Read 안산 출장샵 on for details on 안동 출장샵 this casino, game selection,