शब्द मौनातले



त्या सुंदर नदी किनारी,
मी किती वेचले शिंपले,
साथ होती तुझी अन,
होते हाती हात गुंफले......

तुझ्या सवे किनारी,
मी दूर दूर चालले,
लाटेसह पाऊल पडता,
जगण्याचे अर्थ बदलले....

मौन ओठांवरी होते,
जरी त्या क्षणी जपले,
कळले होतेच सारे काही,
जे नजरेतून टिपले....

उमगले हळुवार प्रेम,
तुझ्या माझ्यातले,
जाणवले फक्त स्पर्शाने,
दोघांच्याही मनातले....

तूच माझा मीच तुझी,
नकळतच कळले,
आयुष्याच्या त्या वळणावर,
अपुले बंध जुळले....

गुंतलो होतो आपण,
त्या क्षणी जाणवले,
अभाळही होते साक्षीला,
तांबूस खुणा ल्यालेले.... 

सहवासात दोघांच्या,
कितीतरी क्षण सरले,
दोन प्रेमवेड्या जीवांचे,

आयुष्य एकच बनले....

अस्मिता कुलकर्णी 

Share:

0 comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या