चिट्ठीने घातला गोंधळ
अबोल भाषा तुझ्या मिठीची
आठवतेय का तुला,
ती आपली
सुंदर भेट,
पावसाने
अचानक तुला,
गाठलं
होतं थेट..
ओलाचिंब
होऊन,
आला
होतास तू घरी,
माळून
गजरा केसात,
मी ही
उभी पाठमोरी..
वळून
तुजला पहिले
अन शब्द
माझे हरवले,
पाहिलेस
तू असे की,
मन माझे
शहारले..
अंगावरती
उडवलंस,
तुझ्या
केसंवारचं पाणी,
नजरानजर
होताच,
उगाच
काहीसं आलं मनी..
सहवास
तुझा हवासा,
स्पर्शाचा
ध्यास होता,
जवळ येऊन
म्हणालास,
तुझा
अंदाज खास होता..
तू
घेतलेस कवेत मला,
जाणीव
झाली खऱ्या प्रेमाची,
उमजली
तेंव्हा मला सख्या,
अबोल भाषा तुझ्या मिठीची..
- अस्मिता कुलकर्णी
जीवन एक सुंदर गाणं ♫♫♫
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं...
आपल्याच अवखळ शब्दात,ते अगदी सहज मांडावं,
स्वतःच्या स्वरातच पण,स्वच्छंदपणे गुणगुणावं,
प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫
तालासुरांसारखंच नात्यांना,कसं हळुवार जपावं,नात्यांच्या सोबतीनेच,ते अगदी सुरेल रंगवावं,प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫
सुख दु:खाच्या मैफिलीत,कधीतरी हरवून जावं,मनाला साद घालत,भान हरपून गात रहावं,प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫
तक्रार असली तरी, लयबद्ध असावं,माघार घेतली कधी तरी, स्थितप्रज्ञ असावं,गुणगुणता येईल सर्वांबरोबर,असं सहज सोप्पंही दिसावं,प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫
मग कधीतरी शांत बसून,आपल्यालाच ऐकावं,पुढचे स्वर हसरेच लागू दे रे,मागणं एकच असावं,प्रत्येकाचं जीवन, एक सुंदर गाणं असावं... ♫♫♫
- अस्मिता कुलकर्णी
😇🙃 स्वप्नांची दुनिया 🧐😴
किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया
कधी होतो अखंड प्रेमात मग्न
दुसऱ्यांदाही कधी लागतं लग्न,
लग्नाच्या वरातीत स्वतःच नाचतो,
स्वतःच्याच लग्नात मंगलाष्टकं म्हणतो,
कशी सगळी वाटते ना ही मोहमाया,
किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
अभ्यास करतो कधी भूगोलाचा,
पेपर समोर वेगळ्याच विषयाचा,
अर्धवट पेपर सोडण्यातही आनंद वाटतो,
मग नापास झाल्याचा रिझल्ट हातात पडतो,
खूप झाली भीती मनात ती रात्र जागवाया,
किती भन्नाट आहे ही स्वनांची
दुनिया.... 😇
कधी असते भयाण शांतता,
कधी काळोख दिसतो,
कधी नुसते रडण्याचे आवाज तर,
कधी बत्तीशी काढून हसतो,
थेट गप्पा असतात बरं भूता प्रेतांशी,
कधी देवाच्या दरबारातल्या आपणच रंभा
ऊर्वशी,
देवाला मदत हवी रे तुझी म्हणून कोणी
येतं बोलवाया,
कसली भन्नाट आहे ना ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
कधी मन खचून जातं,
उत्साही आयुष्य भकास होतं,
जेंव्हा घरातलं हसतं खेळतं माणूस,
आपला निरोप घेतं,
आभाळ पडतं, पायाखालची जमीन हादरते,
जेंव्हा तेच माणूस सकाळी आपल्याला
उठवायला येतं,
तसा तो एक क्षण पुरेसा आहे त्याची
किंमत कळाया,
खरच किती भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇
कधी परग्रहावरची स्वारी तर,
कधी एलिअनच आला घरी,
आपणच कधी हिरोईन असतो
कधी रोल व्हीलनचाही मिळतो,
खरं तर कशाचा कशाला मेळ लागत नाही,
अर्थ लावत बसलो तर, समजेल असा खेळ नाही,
पण गंमत येते हे सगळं काही बघाया,
खरच कसली भन्नाट आहे ही स्वप्नांची
दुनिया.... 😇🙃🧐😴
- अस्मिता कुलकर्णी