बाकावरची चिट्ठी
दुसरीलाच मिळाली,
नजरा नजर करून तिनेच
होकारार्थी मान हलवली.. 😇
मी काय करू,
कळालेच नाही आत्ता,
मागावर माझ्या राहून तिने,
घरचाही शोधला पत्ता.. 🤨
न सांगताच आली,
नटून थटून माझ्या घरी,
आई बाबा घरात माझे,
म्हणे, “मी तुमच्या मुलाच्या स्वप्नातली परी”.... 🥰
अजूनही मी तिला टाळत होतो,
खरं सांगण्याचा बहाणा शोधत होतो,
खरं तर, धांदल उडाली तेंव्हा माझी,
जेंव्हा झाले दोन्ही घरचे राजी.. 😬
समजवण्याचा त्यांना खूप प्रयत्न केला,
घरातच नाही, अख्ख्या कॉलनीत बोभाटा झाला,
आई-बाबांनी तिची अख्खी कुंडली काढली,
आमच्या बंड्याने, लाखात एक मुलगी निवडली.. 🤗
सनई चौघड्याचे सूर नांदले दारी,
अवघ्या लोकांना पाहून मला आली घेरी,
नाईलाज झाला माझा, ठेवावी लागली चुप्पी,
बाबांना हार्टचा त्रास तर आईला शुगर आणि बी.पी.. 🤐
चक्क संसार झाला की हो सुरु,
मला अजूनही प्रश्न मी काय करू?
खरं तर, तीच आधीपासून होती माझ्या प्रेमात,
मी मात्र रात्रंदिवस झुरतोय आतल्या आत..😪
- अस्मिता कुलकर्णी