अबोल भाषा तुझ्या मिठीची



आठवतेय का तुला,  

ती आपली सुंदर भेट

पावसाने अचानक तुला

गाठलं होतं थेट.. 

 

ओलाचिंब होऊन

आला होतास तू घरी

माळून गजरा केसात

मी ही उभी पाठमोरी.. 

 

वळून तुजला पहिले 

अन शब्द माझे हरवले

पाहिलेस तू असे की,

मन माझे शहारले..   

 

अंगावरती उडवलंस

तुझ्या केसंवारचं पाणी

नजरानजर होताच

उगाच काहीसं आलं मनी.. 

 

सहवास तुझा हवासा

स्पर्शाचा ध्यास होता

जवळ येऊन म्हणालास

तुझा अंदाज खास होता.. 

 

तू घेतलेस कवेत मला,  

जाणीव झाली खऱ्या प्रेमाची

उमजली तेंव्हा मला सख्या

अबोल भाषा तुझ्या मिठीची.. 

-  अस्मिता कुलकर्णी

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या